सर्व स्त्री-मनांचा विचार करणारी मंदोदरी आणि फक्त स्वत:चा विचार करणारी शूर्पणखा!
“नाही मंदोदरी, तेवढं ज्ञान आहे आम्हाला. तू उगाच चिंता करते आहेस.” मी स्मितहास्य करत म्हटलं, “कठोर वाटतेस पण मनानं खूपच हळवी आहेस. सीतेची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. शूर्पा प्रतिशोधासाठी तळमळत आहे. तिला अशोकवनात प्रवेश देऊ नका. ती कोणत्याही स्तरावर जाऊन बोलली तरी तिला समजावून घ्या. दोघींवरही कडक लक्ष ठेवण्याचे आदेश द्या.” मंदोदरीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मितहास्य तरळलं.......